स्मार्ट बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2021 | शनिवार | एबीपी माझा
१. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजीची दरवाढ, सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये-पीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका
महानगर गॅसनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो ३ रुपये ६ पैशांनी तर पीएनजी २ रुपये ६ पैशांनी महागला आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे...नव्या दरानुसार मुंबईत १ किलो सीएनजीसाठी ६१ रुपये 50 पैसे तर एक किलो पीएनजीसाठी ३६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या दोन महिन्यातली सीएनजी आणि पीएनजीमधली ही दुसरी वाढ आहे.
२. संप सुरुच ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा, 500 कंत्राटी कर्मचारी बडतर्फ, 2019 च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना संधी
३. कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय, अनेक आगारातील वाहतूक अंशतः सुरु
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली जात आहे. दुसरीकडे आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे..गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय..कर्मचाऱ्यांना भीती दाखवू नका, असं म्हणत सदावर्ते यांनी अनिल परबांना इशारा दिलाय. कोल्हापूरमधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामाव हजर होणार असून एसटीची सेवा सुरळीत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
४. राज्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग, मध्य महाराष्ट्र, कोकणासह मुंबईत 29-30 नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता
५. पन्नास लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सनं मंदीर उडवून देऊ, पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ देवस्थानाला धमकीचं पत्र, परळीकरांना घाबरुन न जाण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन
६. काही दिवसांपासून घरावर पाळत ठेवली जात असल्याचा नवाब मलिकांचा आरोप, वाहनांचे फोटो ट्विट, तर वानखेडेंच्या याचिकेवर नव्यानं सुनावणीची हायकोर्टाला विनंती
७. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग, 99 टक्के ग्रामस्थांचं पुनर्वसन करण्यात सिडकोला यश, विमानतळ उभारणीचं मुख्य काम जानेवारीपासून
८. नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? DGCA आज निर्णय घेणार
९. नागपूर पोलिसांचा हवाला व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक, 84 लाखांची रोकड जप्त
१०. भारताला न्यूझीलंडचं चोख प्रत्युत्तर, दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 129 धावा, आज भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा