Parambir Singh : तेलगी घोटाळ्यातही परमबीर यांचा सहभाग, अॅड. सतीश उके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
परमबीर सिंह यांचा राज्यातल्या बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप नागपुरातले वकील अॅड सतीश उके यांनी केलाय..राज्यात तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तेव्हा परमबीर सिंह ठाणे जिल्ह्यात पोलीस अधिकारी होते..त्याच काळात ठाणे जिल्हा पोलिसांना अब्दुल करीम तेलगीची प्रिटिंग प्रेस ठाण्यात असल्याची माहिती मिळाली होती..ती प्रिंटिंग प्रेस जप्त करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती संबंधित पोलिस अधिकाऱ्याने तीन वेळेला परमवीर सिंह यांना केली होती.. मात्र परमवीर सिंह यांनी त्यासंदर्भातली आवश्यक परवानगी दिली नाही.