Appasaheb Ramachandra Deshmukh : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. ही अटक मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. PMLA न्यायालयाने त्यांना 24 जून पर्यंत ईडीकडे कोठडी दिली आहे.
गेल्यावर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना अटक केली आहे. अप्पासाहेब देशमुख हे डॉ. महादेव देशमुख यांचे सख्खे भाऊ आहेत. अप्पासाहेब रामचंद्र देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या यादीतील हे पाच नंबरचे आरोपी आहेत.