विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2018 09:53 PM (IST)
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 25 जूनला होत आहे, त्यातच आता विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणी होईल. या सदस्यांचा कार्यकाळ संपणार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे. विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम 28 जूनला नॉटिफिकेशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत : 5 जुलै अर्जाची पडताळणी : 6 जुलै अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 जुलै मतदान : 16 जुलै (स. 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत) मतमोजणी : 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेनंतर)