नागपूर : राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव हा कायमच सर्वांसाठी चर्चेचा आणि डोकेदुखीचा विषय ठरतो. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांनी गुंडांना तसेच गंभीर गुन्हे असलेल्यांना उमेदवारी दिल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र सर्वसामान्यांना याबाबत माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचे फोटो मतदान केंद्राबाहेर झळकवण्याचा निर्णय घेतला आहे.


निवडणुका आल्या गुंडांचा थाटात पक्षप्रवेश होतो. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. गुन्हेगार उमेदवाराची माहिती स्वतः निवडणूक आयोगच देणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्यात येईल.

मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून उमेदवाराची 'कारकीर्द' जाहीर करण्यात येईल. नागपूर महापालिका निवडणुकीत हा फंडा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी का होईना, राजकीय पक्षांना गुन्हेगारांपासून दूरच राहावे लागेल.