यवतमाळ/नांदेड/हिंगोली : यवतमाळ, नांदेड आणि हिंगोलीमधील अनेक भागात आज (शुक्रवारी) रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु तीनही जिल्ह्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.


यवतमाळच्या महागाव, उमरखेड भागात, नांदेडमधील किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव भागात आणि हिंगोलीमधील कळमनुरी, वसमत तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. परिसरातील नागरिक घाबरले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक शेतात, खुल्या मैदानांमध्ये तसेच रस्त्यांवर जमले आहेत.

VIDEO | यवतमाळ, नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | ABP Majha


भूंकपाच्या तीव्रतेची माहिती अद्याप मिळालेली नाही. काही वेळात मोरशी येथील भूकंपमापक केंद्रवरून माहिती दिली जाईल. दरम्यान, काल (शुक्रवारी) सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे हादरे बसले होते.

सोलापुरात भूकंपविरोधी सुरक्षा घरांचं प्रात्यक्षिक | एबीपी माझा