Earthquake : विजापूरसह जम्मू काश्मीरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाच्या धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 2.21 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही, असं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून सांगण्यात आलं आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती, असंही सांगण्यात आलं आहे.
भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे? याबाबत अद्याप सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भूकंपानं कुठलीही हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे.
दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या दिंडोरीमध्ये देखील भूकंपाचे झटके जाणवले होते. त्याआधीही नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जिल्हा प्रशासनाकडून घाबरुन न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं.
जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप
तिकडे, जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 3.28 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 62 किमी अंतरावर 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये देखील रात्री 2.55 च्या सुमारास 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 80 किमी होती.
...
इतर महत्वाच्या बातम्या
Earthquake : कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, कोयना धरणाला कोणताही धोका नाही