ताडोबात कुठलाही प्राणी पाहताना सुरक्षित अंतर राखणे फार आवश्यक आहे आणि त्या प्राण्याच्या रस्त्यात आपली गाडी अडथळा ठरू नये असं देखील पहावे लागते. मात्र या व्हिडीओत पर्यटक दोन्ही बाजूला रस्ता बंद करून उभे असल्याचे दिसून येत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सध्या दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पर्यटकांनी फुलून गेला आहे. मात्र सोशल मीडियावर वायरल झालेल्या काही दृश्यात पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचे या दृश्यात दिसत आहे.
हा प्रकार चुकीचा असून ताडोबातील व्यवस्थापनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे.
पहा व्हिडीओ