Earthquake and rain : राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये काल (10 जुलै 2024) 4.5 रिश्टर स्केल एवढ्या तिव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यामुळं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मराठवाडा (Marathwada) विभागातील एकूण 4 जिल्ह्यांमध्ये तर विदर्भ (Vidarbha) विभागातील 1 जिल्ह्यांमध्ये भुकंपाचे धक्क जाणवले आहेत. दरम्यान, भूकंप व पावसाचा नेमका संबंध काय ? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 


भूकंपाचा पावसाशी काय संबंध?


मराठवाडा विभागातील जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 ते 7.30 या दरम्यानच्या कालावधीमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाची तिव्रता 4.5 रिश्टरची नोंद झाली आहे. तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भागांमध्ये भुकंपाचे तिव्रता अधिक होती. भुकंपाचा पावसाशी काय संबंध?  याबाबत पंजाबराव डख यांनी माहिती दिली आहे. राज्यांमध्ये भुकंपाचे धक्के हे भविष्यात चांगल्या पावसाचे चिन्ह असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. भुंकप हा एक प्रकारे चांगल्या पावसाचे लक्षणे दर्शवितो. ज्या-ज्या वेळी भुकंपाचे धक्के बसतात , त्या- त्या वेळी चांगला पाऊस पडतो असे पंजाबराव डख म्हणाले. यावेळी पंजाबराव डखांनी किल्लारी भुकंपाची आठवण करुन दिली. ज्यावेळी 1993 मध्ये किल्लारीला भुकंप झाला होता. त्यावेळी खुप पाऊस झाला होता. तशीच स्थिती यंदा निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


हिंगोलीतील भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा हा बाळापूर परिसर


हिंगोलीत पहाटे भूकंपाचा धक्का बसला. पहाट असल्यामुळे या रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. रस्त्यावरही शुकशुकाट होता. यावेळच्या एक सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक-दुसरी दुचाकी येताना दिसतेय. त्यानंतर दोन सेकंदांनी या सीसीटीव्हीतील फुटेज हालताना दिसत आहे. या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. हिंगोलीतील भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर हा परिसर असल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भातील वाशीम जिल्ह्यातही भूकंपाचे हादरे बसले आहेत. मिळालेल्या माहितानुसार या जिल्ह्यात सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी अशा एकूण दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले असले तरी सदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 


महत्वाच्या बातम्या:


Video : हादरणारी जमीन, हलणारा फॅन, भूकंपाचा पहिला व्हिडीओ समोर; मराठवाडा, वाशिममध्ये धरणीकंपामुळे भीतीचं वातावरण!