यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपूर पोलिसांनी (शनिवारी) रात्री नाकाबंदीदरम्यान आभाई फाट्यावर एका वाहनातून तब्बल 10 लाख 80 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. कारमधून पैसे घेऊन जाणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिरपूर पोलीस रात्री वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपाना येथून दोन जण शिरपूरच्या दिशेने जात होते. यावेळी पोलिसांना दोघे प्लास्टिकच्या गोणीमध्ये काही घेऊन जात असल्याचे तपास करताना लक्षात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही.
पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यानंतर गोणीमध्ये 10 लाख 80 हजारांची रक्कम मिळाली आहे. कारमध्ये मिळालेली रक्कम जिनिंगची असल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्यांच्याकडे पैशांबाबत काही कागदपत्रे नव्हती.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पकडलेली रक्कम उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली सध्या अचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ही रक्कम कोणत्या कामासाठी नेत होते याचा तपास पोलीस करत आहेत.
नाकाबंदीदरम्यान गाडीमध्ये आढळली 10 लाखांची रोकड, दोन जण ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2019 11:12 AM (IST)
शिरपूर पोलीस रात्री वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपाना येथून दोन जण शिरपूरच्या दिशेने जात होते. यावेळी पोलिसांना दोघे प्लास्टिकच्या गोणीमध्ये काही घेऊन जात असल्याचे तपास करताना लक्षात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -