सांगली : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगावमधील ऐतिहासिक मोहरम यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधीने साजरा करण्यात आला. दरम्यान हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व गेल्या दोन शतकापासून सुरू असलेल्या मोहरम व गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळ्याला यावर्षी कोरोनामुळे खंड पडला. त्यामुळे इतिहासात प्रथमच येथील सुरेशबाबा देशमुख चौक-मोहरम मैदान पूर्णपणे सुन्न सुन्न पडले होते. यावेळी कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना अल्लाह आणि पैगंबरांचे नातू हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्याकडे करण्यात आली.
कडेगाव येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहे. येथील मोहरांची परंपरा वेगळी आहे. या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. परंतु चालुवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने सर्वच धार्मिक सण आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे चालू वर्षी मोहरम सणही पारंपरिक पद्धतीने व धार्मिक विधीने साधेपणाने ताबूतांची उंची कमी करून साजरा करण्यात आला. आज सकाळी 10.30 वा पारंपरिक पद्धतीने मानाचा सात भाई ताबूत जवळ प्रथम फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला. त्यांनतर मानाचा सात भाई ताबूतचा उत्सुद घेऊन हकीम, बागवान, देशपांडे, शेटे, पाटील, अत्तार, इनामदार, तांबोळी,0 सुतार, माईनकर, मसूदमातासह आदी ताबूत व पंजे बारा इमाम पंजे वगैरे ठिकाणी फातेहा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला.
यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला. कडेगाव येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहेत. येथील मोहरांची परंपरा वेगळी आहे. या ठिकाणी मोहरम निमित्त 14 ताबूत बसवले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. दरम्यान यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील आदींनी ताबूताना भेटी दिल्या.
कडेगावचा मोहरम प्रसिद्ध
सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा त्याचे प्रतीक आहे. गेली 150 वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फुट असणारे गगनचुंबी ताबूत अर्थात डोले. हे ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे. मुस्लीम धर्मीयांच्या बकरी ईदनंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरवात होते. विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूता मध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही.
सोहळ्याला ऐतिहासिक परंपरा
गगनचुंबी ताबूत सोहळ्याचा प्रारंभ हा येथील तत्कालीन संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे सरकार यांनी केला. या मागेही विशेष कथा आहे.कराड येथे, त्यावेळी पार पडणाऱ्या ताबूत भेटी सोहळा पाहण्यासाठी देशपांडे सरकार गेले असता, त्या ठिकाणी त्यांचा योग्य तो मानसन्मान झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या देशपांडे सरकार यांनी कडेगावमध्ये जगात नावाजले जाईल, असा ताबूत भेटींचा सोहळा सूर करण्याचा निर्धार केला. त्या काळापासून कडेगावमध्ये सर्व समावेशक असा मोहरमचा ताबूत भेटींची सोहळा सुरु झाला. ज्यामध्ये गावातील हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. आज मोहरमच्या दिवशी हा सोहळा दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला. कडेगाव शहरातील जुने एसटी स्टँड चौकात ताबूत भेटी पार पडल्या, मोठ्या जल्लोषात गगनचुंबी ताबूत भेटींचा हा लक्षणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कनार्टक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
TOP 50 | दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या