सांगली: सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसानं हुलकावणी दिली आहे. जिल्ह्यातील आटपाडी, जत, खानापूर तालुक्यांकडे पावसानं पाठ फिरवल्यानं खरीपाचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळं आता जनावरांच्या चाऱ्याचा आणि रब्बीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
सध्या सांगली जिल्ह्यातील 44 गावांना टँकरनं पाणीपुरवठा सुरु असून दुष्काळी तालुक्यातील 78 तालुक्यांपैकी 15 तलाव कोरडे पडले आहेत, तर 23 तलावातील पाणीसाठा मृतावस्थेत आहे.
त्यामुळे 44 गावातील 92 हजार ग्रामस्थांना टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे. खानापूर तालुक्यातील 10 आटपाडीतील 9 गावांसह वाड्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे धरणांमधून जत, आटपाडी तालुक्यांसाठी पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.