मुंबई : राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यामुळे आता त्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात होईल. 180 तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
राज्यात सरासरीच्या केवळ 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दुष्काळसदृश भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीमही महाराष्ट्रात येईल. त्यानंतर मदतीचीही घोषणा केली जाईल.
राज्यात 'या' उपोययोजनांना सुरुवात :
- जमीन महसुलातून सूट
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या बिलामध्ये सूट
- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट
- पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना
- टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे