मुंबई : कोरोनानाचा देशासह राज्यात अनेकांचा बळी गेलाय. सामान्य माणसांसह अनेक फ्रंटलाईन वर्कर्सना देखील कोरोनामुळं आपला जीव गमावावा लागला आहे. प्रशासनात काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना देखील कोरोनामुळं जीव गमावावा लागला आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं जीव गेला आहे. 


कोरोनामुळं मंत्रालयातील सहसचिव संतोष भोगले यांचं निधन झाले आहे.  विविध विभागात काम पाहिलेले सह/अवर सचिव संतोष भोगले यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.  भोगले यांनी नंदन निलेकणी यांच्या प्रमुख कल्पनेतेतून नव्यानेच सुरु  झालेल्या आधारे कार्डसंदर्भात राज्यात काम पाहिलं होतं. 


हे काम त्यांनी पुढे नेण्यास तत्कालीन माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश जैन यांच्यासोबत प्रचंड मेहनत घेतली होती. डिजिटल सातबारा हे नवीन कार्य सुद्धा त्यांच्याच कामाचं भाग होता. भोगले हे एक उत्कृष्ट मॅरेथॉन पटू होते. स्वभावाने अतिशय मनमिळावू असेलल्या भोगले यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.