मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 2009 च्या गोवा स्फोटाच्या तपासात हलगर्जी झाली नसती, तर पुढे जाऊन दाभोलकरांच्या हत्येचा कट रचलाच गेला नसता, असा दावा सीबीआयने केला आहे.

 
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार 2009 मधील गोवा बॉम्बस्फोटातील आरोपी मलगोंडा पाटील याने स्फोटानंतर आपला शेवटचा कॉल डॉ. वीरेंद्र तावडेला केला होता. याचसोबत सारंग अकोलकरनेही गोवा स्फोटाच्या आधी आणि नंतर डॉ. तावडेशी फोनवरुन संपर्क साधला होता.

 
गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य रितीने केला नाही. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे य़सोपवण्यात आला. यात पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाली होती.