मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती आहे. या निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.


नागपूरच्या दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी नागरिकांची पावलं नागपूरच्या दिशेनं निघाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. दीक्षाभूमीवर अर्धा तास थांबल्यानंतर मोदी कोराडी, चंद्रपूर आणि परळीतल्या नव्या वीज संचाचं लोकार्पण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/852682546542456837

ट्विटरनेही बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी विशेष हॅशटॅग सुरु केले आहेत. बाबासाहेबांशी निगडीत पाच विशिष्ट हॅशटॅग वापरल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेली इमोजी येईल.

संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. गेल्या वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. त्याच धर्तीवर आता ट्विटरनंही हे खास इमोजी तयार केले आहेत.

संबंधित बातम्या :


आंबेडकर जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीवर, नागपुरात स्वागताची तयारी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून 5 खास हॅशटॅग