Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम आज (28 ऑगस्ट) देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स 650 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 निर्देशांकही 150 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 80,108.41 अंकांवर व्यवहार करत होता, म्हणजेच 678.13 अंकांनी किंवा 0.84 टक्के घसरला. निफ्टी 176.25 अंकांनी किंवा 0.71 टक्के घसरून 24,535.80 अंकांवर आला. बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद होता. मंगळवारी सेन्सेक्स 850 अंकांनी घसरल होता. सेन्सेक्समधील शेअर्समध्ये एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, बीईएल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी सर्वाधिक घसरले. दुसरीकडे, एटरनल, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि एल अँड टी वधारले. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स 4.5 टक्क्यांहून अधिक घसरले. कंपनीचे प्रवर्तक राकेश गंगवाल यांच्या कुटुंबाने ब्लॉक डीलद्वारे 3.1 टक्के हिस्सा विकला आहे.


यूएस टॅरिफचा कोणाला फटका बसणार?


बुधवारपासून अमेरिकेत भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के कर लागू झाला. याचा सर्वाधिक फटका कापड, रत्ने आणि दागिने, कार्पेट, फर्निचर आणि कोळंबी उद्योगांना बसण्याची अपेक्षा आहे. व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप इंडेक्स आणि निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 0.83 टक्क्यांनी घसरले. इंडिया VIX 5 टक्क्यांनी वाढला. क्षेत्रनिहाय, निफ्टी बँक इंडेक्स आणि निफ्टी मेटल 2.9 टक्क्यांनी घसरले. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी रिअॅलिटी एक टक्क्यांहून अधिक घसरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.


अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय कंपन्यांचा वाटा कमी होईल


दुसरीकडे, आजपासून, म्हणजे 27 ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के कर लागू झाला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, या नवीन कर आकारणीमुळे भारताच्या सुमारे 5.4 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. 50 टक्के कर आकारणीमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, रत्ने-दागिने, फर्निचर, सीफूड यासारख्या भारतीय उत्पादनांना महागडे पडेल. यामुळे त्यांची मागणी 70 टक्के कमी होऊ शकते. चीन, व्हिएतनाम आणि मेक्सिकोसारखे कमी कर आकारणारे देश या वस्तू स्वस्त दरात विकतील. यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय कंपन्यांचा वाटा कमी होईल.


इतर महत्वाच्या बातम्या