लातूर : शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या 20 वर्षीय मातेने आत्महत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली. बाळावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते, स्वतःकडचे सर्व पैसे संपले होते. याच विवंचनेतून राधिका चव्हाण यांनी आत्महत्या केली.
लातूर जिल्ह्यातील बुधडा गावात राहणाऱ्या राधिका यांचं 27 मे रोजी सिझर करण्यात आलं होतं. बाळाच्या जन्मानंतर त्याला कावीळ झाला. मात्र रोजंदारीवर पोट भरणाऱ्या राधिका चव्हाण यांच्याकडे पैसे नव्हते.
प्रसूतीदरम्यान रोजंदारीमध्ये खंड पडल्यामुळे स्वतःकडे होते तेवढेही पैसे संपले. स्वतःच्या लेकरावर उपचार करण्यासाठीही आपल्याकडे पैसे नाहीत, या नैराश्यातून राधिक चव्हाण यांनी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं.
खरं तर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पैसे कमी लागतात. मात्र बाळावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने मातेने आत्महत्या करणं हे धक्कादायक आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राधिका यांच्या आत्महत्येमुळे दहा दिवसांचं बाळ पोरकं झालं आहे.
बाळावर उपचारासाठी पैसे नसल्याने लातुरात मातेची आत्महत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
04 Jun 2018 10:44 PM (IST)
बाळावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते, स्वतःकडचे सर्व पैसे संपले होते. याच विवंचनेतून राधिका चव्हाण यांनी आत्महत्या केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -