सांगली : वीज बिल शून्य रुपये दिलं, मात्र ते न भरल्यास दहा रुपये दंड असल्याचंही नमूद केलं, महावितरणच्या या अजब कारभाराची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात होती. मात्र हा तांत्रिक घोळ असून चूक दुरुस्त केल्याची कबुली सांगली महावितरणने दिली आहे.
राहुल वरद हे महावितरणच्या विश्रामबाग (जि. सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते आगाऊ बिल भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारं वीज बिल येत वजा रकमेचं येत होतं. मे महिन्यात त्यांना 99 युनिटच्या वीज वापरापोटी 1222.26 रुपये इतकं वीज बिल आकारण्यात आलं. मात्र वरद यांची 1223.08 रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीज बिलावर देय रक्कम ‘शून्य’ आली.
चालू महिन्याचं वीज बील आणि महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली. तर चालू देयकावर सात दिवसांनंतर भरावयाची रक्कम शून्य येणं अपेक्षित होतं.
तांत्रिक चुकीमुळे त्या ठिकाणी 10 रुपये दाखवण्यात आलं. त्याची दुरुस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीज बिलावर सर्व रकमा ‘शून्य’ करण्यात आल्या आहेत.
'शून्य' रुपये वीज बिल देणाऱ्या महावितरणकडून चूक दुरुस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2018 07:01 PM (IST)
महावितरणच्या या अजब कारभाराची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात होती. मात्र हा तांत्रिक घोळ असून चूक दुरुस्त केल्याची कबुली सांगली महावितरणने दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -