बीड : शहरात एका डॉक्टरांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, याच घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. डॉक्टरांनीच मेडिकल दुकान जाळण्यासाठी स्वतः आग लावली होती. मात्र, तिथे असलेल्या सॅनिटायझरमुळे आगीचा भडका उडाला आणि यात स्वतः डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा येथील मेडिकलला आग लागून डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना रविवार मध्यरात्री घडली होती. या घटनेत डॉक्टरचा मृत्यू झाला होता. मात्र, मृत डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35) यांनीच ही आग लावल्याचा जवाब सोबत जखमी असलेल्या सुनील माळी याने दिल्यामुळे पोलिसांनी मृत डॉक्टर भाऊसाहेब चोरमले व गंभीर जखमी असलेल्या सुनील माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


जुन्या वादातून घडली घटना


तलवाडा ङ्गाट्यावर डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री मेडिकल लागलेल्या आगीत चोरमले यांचा मृत्यू झाला होता. मृत डॉक्टर व मेडिकल चालकांचा मेडिकल वरील औषधांच्या कमिशन मधील देवाण-घेवाण वरून जुना वाद होता. त्या रागातून डॉक्टरने आपला सहकारी असलेल्या सुनील माळी याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले होते. डॉक्टरने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्याच चावीने डॉक्टरने मेडिकलचे शटर उघडले व ते आत गेले आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर पंधरा फूट लांब फेकले गेले होते.


नागपुरात हत्यासत्र सुरुच! 11 दिवसांत जिल्ह्यात 11 तर शहरात 8 खून; आज कुख्यात गुंड बाल्या वंजारीची हत्या


यावेळी बाहेर उभा असलेला कंपाऊडर सुनील माळी जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. मात्र, तपासामध्ये पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या होत्या. डॉक्टर इतक्या रात्री मेडिकलमध्ये कशाला गेले? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना मिळत नव्हते आणि इथूनच तपासाला सुरुवात झाली.


ही सगळी घटना ज्यावेळी घडली त्यावेळी कंपाउंडर वगळता इतर कुणीही याचा प्रत्यक्षदर्शी नव्हता. म्हणूनच पोलिसांनी जखमी कंपाउंडरकडे या प्रकरणाची कसून चौकशी केली. सुरुवातीला या कंपाउडरनेही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारपूस सुरू केल्यानंतर कंपाउंडरने घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली.


मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर असावे असाही कयास लावला जात असून या ठिकाणी असलेल्या फ्रीजने यावेळी पेट घेतला होता. सॅनिटायझरने पेट घेतल्यामुळे स्फोट झाला व डॉक्टर बाहेर बाहेर फेकले गेले असावे अशी शक्यताही वर्तवली जात आहे. शुल्लक कारणाच्या वादावरून डॉक्टराने मेडिकल दुकान जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांचाच घात झाला आणि अवघ्या चाळीशीमध्ये असलेल्या एक तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला.


Beed Murder | बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, 12 संशयित ताब्यात