कोल्हापूर : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात डॉक्टर दाम्पत्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. डॉ. उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी असं या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे.
हे दाम्पत्य मागील 40 वर्षांपासून रुकडी गावात 10 बेडचं छोटसं हॉस्पिटल चालवत होतं. पण तीन दिवसांपासून रुग्णालय बंद होता. त्यामुळे आज सकाळी ग्रामस्थांनी दरवाजा फोडला असता त्यांना दोघांचेही मृतदेह आढळले.
डॉ. उद्धव आणि प्रज्ञा यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करुन त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.