मुंबई : महाराष्ट्रातील 3 आमदारांनी वेतनवाढ नाकारली आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. अमरावतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सर्वप्रथम ही वेतनवाढ नाकारली होती.

 

वेतनवाढ नाकारणाऱ्या आमदारांमध्ये अमरावतीच्या श्रीकांत देशपांडेंसह रामनाथ मोते आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे. हे तिघेही शिक्षक आमदार आहेत. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे वेतनवाढ स्वीकारणे चुकीचे ठरेल असे मत त्यांनी मांडल आहे.

 

महाराष्ट्रातील 288 विधानसभा आमदार, 78 विधानपरिषद आमदार आणि 39 मंत्र्यांच्या वेतनात वाढ झाली आहे.
दरम्यान, अशाप्रकारे वेतनवाढ नाकारता येत नाही. त्यामुळे वाढलेले वेतन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 

पाहा व्हि़डीओ :