कोल्हापूर : कोल्हापुरात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुधीर कुंबळे असं या डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सुधीर कुंबळेकडून बनावट नोटा आणि साधनसामुग्री जप्त केली आहे. तसंच त्याच्याकडे 100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटाही पोलिसांना सापडल्या आहेत.
आरोपी सुधीर कुंबळे शूज खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा खपवत होता. दुकानदार औरंगजेब नदाफ यांच्या दुकानात तो शूज घेण्यासाठी आला होता. मात्र नदाफ यांच्या चाणाक्ष नजरेमुळे डॉक्टरचा डाव उजेडात आला.