मुंबई : माथाडी कामगारांच्या बँक खात्यातून 36 कोटी रुपये गहाळ करणाऱ्या 57 वर्षीय होमिओपॅथी डॉक्टरला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. तर याच प्रकरणांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील एका शाखेमधील मॅनेजरचा शोध अर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. आता पर्यंत 12 कोटी रुपये पोलिसांनी रीकव्हर केले आहेत.


अटक करण्यात आलेल्या डॉक्‍टरचं नाव मुबारक पटेल असून मुलुंडमध्ये तो प्रॅक्टिस करायचा. हा प्लान डोक्यात येताच मुबारक पटेल यांनी स्टेट बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि त्याला सर्व कल्पना समजून सांगितली. त्यानंतर या मॅनेजरने माथाडी कामगार संघटनेशी संपर्क साधला आणि जादा व्याजदराचे आमिष दाखवून त्यांना त्यांचे पैसे स्टेट बँकेमध्ये सुरक्षितपणे एफडी करण्यास सांगितले. डिसेंबर 2018 मध्ये माथाडी कामगार युनियन कडून बँकेत सात फिक्स डिपॉझिटची खाती उघडण्यात आली. ज्यात एकूण 45 कोटी रुपये जमा करण्यात आले. बँके मॅनेजर यांनी 2019 पर्यंत त्यांचे एफडी सुरक्षित असल्याचं या संघटनेला सांगितलं.


मे 2019 मध्ये ऑफिसमधील काम करत असलेल्या लोकांना संशय आला आणि त्यांनी या प्रकाराची चौकशी केल्यावर त्यांना या बँक खात्यातून 36 कोटी रुपये गहाळ झाल्याचं निदर्शनास आलं. हे 36 कोटी रुपये मुंबई, इचलकरंजी आणि गुजरात मधील चार वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी खोटे कागदपत्र देखील वापरण्यात आले होते. ज्यामध्ये लेबर बोर्डाचे बनावट लेटर चा सुद्धा समावेश होता. संशय येऊ नये म्हणून लेबर बोर्डाचे डुबलीकेट लेटर बनून आपल्या कागदपत्रं सोबत जोडण्यात आलं होतं.


या फ्रॉडचा मुख्य आरोपी डॉक्टर मुबारक पटेलला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याचा जोडीदार असलेला बँक मॅनेजरचा शोध सध्या सुरू आहे आणि या प्रकरणांमध्ये अजून त्याचा कोण जोडीदार आहे आणि अजून कोणा कोणाची अशी फसवणूक या लोकांनी केली आहे याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.


संबंधित बातम्या :



एकवेळ शत्रू परवडला पण असे मित्र नको..


Pimpri Mother killed Daughter | पिंपरीत आईनंच केली मुलीची हत्या, त्रास देत असल्याने घेतला मुलीचा जीव