छत्रपती संभाजीनगर : सलाईन लावून उपोषण करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमधील आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित करत उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, पाटील यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला असला, तरी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि 13 ऑगस्टनंतर आम्ही आमची रणनीती जाहीर करू, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


मी स्वतः निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, पण इतरांना तयार करावं लागेल


दरम्यान, मनोज जहांगे पाटील यांनी आज रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा सगेसोयऱ्यांवर निर्णय होत नसल्याने हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की सलाईन लावून उपोषण करणे योग्य नसल्याने स्थगित केलं आहे. आम्ही 288 जागांवर उमेदवार देणार आहोत. मात्र त्याबाबतीत 13 ऑगस्टनंतर निर्णय स्पष्ट करू. मी स्वतः निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, पण इतरांना तयार करावं लागेल, असं त्यांनी नमूद केले. आरक्षण द्यायचं ठरलं असेल, तर त्यांनी द्यावे अशी विनंती सरकारला त्यांनी केली. दरम्यान मराठ्यांचे विरोधात बोलतील ते उमेदवार आम्ही पाडणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. ते म्हणाले की हे जाणूनबुजून मराठ्यांना टार्गेट करतात, मराठा सोडून काही बोलत नाहीत आणि आंदोलन मी यावरच बोलत राहतात. त्यामुळे त्यांना पाडणार असल्याचं पाटील म्हणाले. त्यामुळे आता आम्हाला त्रास देणाऱ्यांची सुट्टी नसल्याचे त्यांनी सांगितले. मी सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला नाही असं नको. सरकार म्हणून शेवटी प्रक्रिया आहे वेळ देणं ही सुद्धा प्रक्रिया आहे. आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करत आहोत, सरकारने सुद्धा सरकारने प्रामाणिकपणे आपलं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 


महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे का?


दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार पाडणार म्हणत, तर तुम्हाला महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे का? अशी विचारणा केली असता म्हणून जरांगे पाटील यांनी  उत्तर दिले ते म्हणाले की छुपा पाठिंबा त्यांनी दाखवून द्यावा असे आव्हान त्यांनी दिले. आरोप करणाऱ्यांना ते म्हणाले की काही नसून मला जेलमध्ये टाकायचे म्हणतात. मात्र लाज वाटली पाहिजे अशी टीका त्यांनी केली. दरेकर आणि भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या टिकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की दरेकर, राणे मैदानात उतरले आहेत. मैदानातील पिल्ले मैदानात येणारच अशी खोचक टीका त्यांनी केली. ज्या दिवशी मी यांच्यावर बोलेन, त्या दिवशी त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या