मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती अतिवाईटाकडे जात आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं. मात्र राज्यात लॉकडाऊन लावणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र लॉकडाऊनला अनेकांनी कडाडून विरोध केला आहे. वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन न लावण्याची सरकारला विनंती केली आहे, लॉकडाऊन उपाय नाही. 


प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये.


राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ


...तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री 
आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे. 


Pune Lockdown : पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन


पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सगळी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील.  मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.


 


सोबतच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली PMPMLची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असतील.