बेळगाव : साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्त्यांना बोलवू नका. स्थानिक साहित्यिक आणि वक्ते यांना निमंत्रित करून साहित्य संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस.बी.बोमनहळ्ळी यांनी सीमाभागातील साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या बैठकीत केली. महाराष्ट्रातून साहित्यिक आणि वक्ते यांना निमंत्रित करू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे संमेलनाच्या आयोजकांची पंचाईत झाली आहे.


एक महिन्यापूर्वीच कडोली आणि येळ्ळूर साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्ते यांना निमंत्रणे गेली आहेत, असं आयोजकांनी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र जिल्हाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. रविवारी इदलहोंड येथील संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्यासाठी आलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना पोलिसांनी संमेलनाला जाण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे श्रीपाल सबनीस यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक शासनाचा निषेध केला होता.


त्यानंतर मंगळवारी सकाळी सीमाभागातील साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले होते. संबंधी सायंकाळी बैठकीसाठी संमेलनाच्या आयोजकांना जिळधिकाऱ्यांनी बोलवले होते. सध्या सीमाभागात तणावाचे वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्ते यांना निमंत्रित न करता संमेलनाचे आयोजन करा, असं सांगितल्यामुळे संयोजकापुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.


कर्नाटकातल्या खानापूर तालुक्यातील इदलहोंडमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार होते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना कर्नाटक पोलिसांनी गावबंदी केली आहे. सीमावासी मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा कर्नाटक सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली आहे. ईदलहोंड येथे आयोजित करण्यात आलेल्या सतराव्या सदभावना मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून आलेल्या संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आहे. आता पोलीस साहित्य संमेलनात देखील दडपशाही करत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.


संबंधित बातम्या