उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये मांसाची फॅक्टरी असल्याचं बुधवारी उघडकीस आल्यानंतर आज या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीच नसल्याचं समोर आलं आहे. तसंच इथं जनावरांच्या हाडापासून भुकटी नव्हे तर मांसापासून चीज आणि बटर तयार करण्यात येत होतं असा आरोप आहे.


 
जनावरांच्या हाडांचा ढीग आणि असह्य कुबट वास... उस्मानाबादच्या पिंपरीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या या कारखान्यांवर काल धाड पडली आणि किळसवाण्या कारखान्यांचा पर्दाफाश झाला.

 
बाबा मुजावर हे कारखान्याचे चालक आणि काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. शफिक कुरेशी हे कारखान्याचे मालक मूळचे मुंबईकर आहेत, पण दोघांनाही कारखान्यातून तयार होणारा पदार्थ कुठे आणि कशासाठी जातो हे सांगता येत नाहीये. कारखान्याचे सहाही मालक मुंबईचे आहेत. कारखान्यातले कामगार बिहारी. सहापैकी दोनच कारखान्यांकडे केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा परवाना आहे.

 

इथं कुठंही भुकटी तयार करताना दिसत नाही, पिंप का आणून ठेवलेत, हे कळत नाही, कदाचित मुंबईतल्या लोकांच्या खाण्यातल्या चीज बटरमध्ये ही मिसळलं जात असावं, अशी शंका आहे.

 
कारखान्यात न येताच औरंगाबादचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी परवाने कसे वाटत होते? असा प्रश्न पडतो. महसुल विभाग, पोलिस आजवर काय करत होते ? सरकारी यंत्रणांना मोठे हप्ते मिळत होते का ? असे प्रश्न कायम राहतात.

 
गेल्या 15 वर्षांपासून हा धंदा राजरोस सुरु होता. आसपासच्या लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. कारवाईसाठी महसूल खात्याचे कर्मचारी आले. सोबत 25 पोलीस 14 बंदुकधारी घेऊन आले. पण फक्त सील ठोकून गेले. चिडलेल्या ग्रामस्थांनी जेसीबी लावून कारखाने उद्ध्वस्त केले. प्रशासनानं त्यांनाच दीड दिवस तुरुंगात टाकलं. लोकांच्या अन्नात विष कालवणारे अजून मोकाट आहेत.