मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फटाकेबंदीवरुन कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा झाली.


दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या




  • कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे

  • दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.

  • दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.

  • सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.

  • धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.


महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का?


राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज (5 नोव्हेंबर) टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.


राजस्थानसारखी महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का? कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा


मुंबई महापालिकेकडून फटाके फोडण्यावर निर्बंध
यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेने निर्बंध घातले आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडा असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. नियमावलीचं उल्लंघन केल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कारवाई होणार आहे.


Diwali Crackers Ban | यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्र सरकारचा फटाका बंदीचा विचार, यंदा फटाकेमुक्त दिवाळी