मुंबई : राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली.


फटाकेबंदी कॅबिनेट मध्ये काय झाले?




  • फटाकेमुक्त दिवाळी व्हावी हा मुद्दा आज कॅबिनेट मध्ये चर्चेला आला.

  • मृत्यू नियंत्रण समिती आणि टास्क फोर्सने फटाकेमुक्त दिवाळी असावी ही भूमिका मांडली होती. तीच भूमीका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कॅबिनेटमध्ये मांडली.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी देखील या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला.

  • काही मंत्र्यांनी फटाके बनवणारे आणि विक्रेते यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. फटाके बंदी केली तर त्यांचे नुकसान होऊ शकेल ही भूमिका मांडली.

  • त्यावर काही मंत्र्यांनी पर्यावरण पूरक फटाके वाजवले जाऊ शकतात अशी ही भूमिका मांडली.

  • मग आपण फटाके फोडू नये असे आवाहन करूया अस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मत मांडले.

  • एकीकडे राजस्थान,ओडिशा, सिक्कीम,दिल्ली सरकार फटाकेबंदीचा थेट निर्णय घेतला तरी अजून राज्य सरकार फटाके बंदी बाबत ठाम भूमिका घेताना दिसत नाही.


दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज (5 नोव्हेंबर) टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.+


मुंबई महापालिकेकडून फटाके फोडण्यावर निर्बंध
यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेने निर्बंध घातले आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडा असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. नियमावलीचं उल्लंघन केल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कारवाई होणार आहे.