मुंबई : आज शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीच्या सुट्या 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत देण्यात येणार असून दिवाळीच्या सणाला 5 दिवस ऑनलाइन वर्गातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार आहे. मात्र, दरवर्षी 18 ते 20 दिवस देण्यात येणाऱ्या शाळांच्या दिवाळीच्या सुट्या फक्त 5 दिवस देण्यात आल्याने शिक्षक व शिक्षक संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन ऑनलाइन शिक्षण देत असताना अनेक ठिकाणी गरज असेल तिथे लॉकडाऊनमध्ये कोविड ड्युटीसाठी सुद्धा हातभार लावला असताना शिक्षकांना फक्त 5 दिवस सुट्या? या सुट्या वाढवून मिळायला हव्या अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली असून या निर्णयावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


15 जूनपासून शाळा बंद असून सुद्धा ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन शिक्षण देऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी यावर्षी कमी सुट्या शिक्षकांना दिल्या गेल्या आहेत. पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणखी काही दिवस वाढवून सुट्या मिळायला हव्यात असा शिक्षकांचा सूर आहे.


राजस्थानसारखी महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का? कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा


शाळा संहितेनुसार शाळांना दिवाळीची सुट्टी घेण्याचा अधिकार आहे. शिक्षकांना वर्षभरात 76 सुट्ट्या मान्य केलेल्या आहेत. पूर्वीपासून शाळेला दिवाळी सुट्टी 21 दिवस होत्या. त्यानंतर 18 दिवस दिवाळीच्या सुट्या दिल्या जात होत्या. पण आताच्या परिपत्रकात 5 दिवस शाळांना दिवाळी सुट्टी दिल्याने मुलांची व शिक्षकांची सुट्टी हळू हळू कमी केली जात आहे. ऑनलाईन शिक्षण लगेच तत्काळ 17 तारखेला सुरू करु नये, सुट्टीचा आनंद मुलांना मिळवा ही विनंती शिक्षण विभागाकडे करत असल्याचा, मुंबई शिक्षक परीषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.


मार्च महिन्याच्या लॉकडाउनपासून शिक्षक कोरोनाशी संबंधित कामे करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवीत आहेत. तसेच उन्हाळ्याच्या हक्काच्या सुट्ट्यांवर पाणी सोडून सलग आपले कर्तव्य करीत असतांना दिवाळीची दिली गेलेली 5 दिवसांची सुट्टी फारच कमी आहे. विद्यार्थी व शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाने किमान 15 दिवस तरी सुट्टी द्यायला हवी होती, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे शिक्षण विभागकडे केली आहे.


Diwali Holidays | शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवस दिवाळीची सुट्टी, फक्त 5 दिवसांच्या सुट्टीमुळे शिक्षक नाराज



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI