दिवाळीच्या तोंडावर फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचं परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.
29 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळेच दिवाळी सण साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांचा पगार हा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होतो. मात्र आता दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देऊन, फडणवीस सरकारने एकप्रकारे दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारडून अकाऊंट्स विभागालाही तसे आदेश दिले आहेत.