सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचं वादळ सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घोंघावत आहे. राणे कोणता निर्णय घेतात, याबाबतची चर्चाही सर्वत्र रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गात जिल्हा काँग्रेसचा सांस्कृतिक मेळावा भारणार आहे. या मेळाव्यात राणे काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

काही दिवसांपासून नारायण राणे भाजपत प्रवेश करणार, या चर्चेनं जोर धरला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे हेही अहमदाबादेतच होते.

त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला आणखीच बळ मिळाले होतं. शिवाय राणेंच्या निर्णयामुळे अनेकांचं आयुष्य घडणार आणि बिघडणार असं वक्तव्य आ. नितेश राणेंनी करुन त्यांच्या पक्षांतराचे संकेत दिले होते.

पण याची बातमी लिक झाल्याने नारायण राणेंसह भाजपमध्येही गोंधळ उडाला. वैयक्तीक कामासाठी कुठेही जाऊ शकत नाही का? असा सवाल करत राणेंनीही याबाबतचं वृत्त फेटाळलं होतं.

यानंतर दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार, काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी राणेंची भेट घेतली. या भेटीत दोघांनी राणेंची मनधरणी केली. मात्र राणेंनी फारशी दाद दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गामधील पडवे इथल्या मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात जिल्हा काँग्रेसचा सांस्कृतिक मेळावा भरणार आहे. या मेळाव्यात राणे काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे ‘राणेसाहेब घेतील तोच निर्णय मान्य’ असे एकच वाक्य सर्व कार्यकर्ते बोलत आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. राणेंच्या कणकवलीमधील ओम गणेश निवासस्थानी बैठक सुरु आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना काय सूचना देतात त्याकडेही लक्ष आहे.

संबंधित बातम्या

नारायण राणेंच्या मनधरणीसाठी काँग्रेस हायकमांडच्या हालचाली


माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात राणेच हजर!


राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?


…तर केंद्रीय मंत्री झालो असतो : नारायण राणे


भाजपची ऑफर जुनीच, अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही : राणे


अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही – राणे


पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!


राणेंच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडणार आणि बिघडणार : नितेश राणे


मुख्यमंत्री आणि नारायण राणेंचा दावा फोल!