नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी स्वयंपाक क्षेत्रात एक नवा विश्व विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. विष्णू मनोहर यांनी सलग 40 तासांहून अधिक वेळ स्वयंपाक करत हा नवा विक्रम केला आहे.

आज पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अमेरिकन बेंजमीन पेरी यांचा 40 तासांच्या सलग स्वयंपाकाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आता विष्णू मनोहर यांची वाटचाल सलग 52 तास स्वयंपाक करण्याकडे सुरु आहे.

मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिन‌िअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात विष्‍णू मनोहर यांनी सलग 52 तासांत एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करुन विश्वविक्रम स्थापन करण्याचा संकल्प केला होता.

आज पहाटे त्यांनी अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांचा विक्रम मोडीत काढला. पेरी यांनी 12 मार्च 2014 रोजी 40 तास कुकिंगचा नोंदवला होता. आता मनोहर यांची नव्या विश्वविक्रमाकडे वाटचाल सुरु आहे.

संबंधित बातम्या

52 तास सलग स्वयंपाक, शेफ विष्णू मनोहर विश्वविक्रमाच्या तयारीत