पिंपरी : मावळ तालुक्यातील सांगवडे गावात एका इसमाची लाकडी दांडक्याने मारहाण आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. नवनाथ लिम्हण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.


घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस त्यांचा शोध घेतायेत. पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज असून याला राजकीय जोड असण्याची शक्यता आहे.

भैरवनाथ मंदिरात कीर्तन सुरु असताना, मंदिरालगत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही हत्या झाली.

हत्या झालेल्या नवनाथ यांची पत्नी ही विद्यमान सरपंच आहे. मुख्य हल्लेखोराची पत्नी ही माजी सरपंच असल्याची पोलिसांची माहिती आहे. याप्रकरणी काही संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत.