Bhandara News भंडारा : राज्यात आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन (World Trible Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राज्य सरकारनं आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर स्थानिक सुट्टी जाहीर करावी, अशा आशयाचा शासन आदेश काल एका अध्यादेशानुसार जाहीर केला. या आदिवासी जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्याचाही (Bhandara News) समावेश आहे.


मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी या शासन आदेशाची अंमलबजावणी केली नाही आणि सुट्टीही दिली नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदनं केला आहे. जागतिक आदिवासी दिन असताना भंडारा जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केला नसल्यानं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.


जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध


जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी तातडीनं माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या परिपत्रकाची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जाळून होळी करून निषेध नोंदविला आहे. यावेळी परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागीतल्या शिवाय आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्राही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी बोलताना व्यक्त केलीय. 


जीर्ण इमारतीत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचं जीवघेणं शिक्षण


आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवनमान उंचावं यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधाचे वस्तीगृह बांधण्यात येतं. भंडाऱ्याच्या तुमसर इथं तीन वर्षापूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून आदिवासी वसतीगृह बांधण्यात आलं. मात्र, या वसतिगृहाचा अद्याप वापर केलेला नाही. किंबहुना विद्यार्थ्यांना अजूनही जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या वस्तीगृहातचं शिक्षण घ्यावं लागत आहेत. त्यामुळं आज जागतिक आदिवासी दिन असल्यानं आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हेडसांड थांबवावी, या मागणीला घेऊन आदिवासी बांधवांनी तुमसर येथे निदर्शनं केलेत. 


जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांची बाईक रॅली 


आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांच्या वतीने भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होतं. यात जिल्हा पोलीस मुख्यालयातून रॅलीने शहराचे भ्रमण केलं. यावेळी रॅलीत पोलीस दलातील कर्मचारी आणि जवानांनी सहभाग  घेतला. आज दिवसभर जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज सर्वदूर आदिवासी दिवस साजरा केला जात आहे. सोबतच आज भव्य दौड स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.  


डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने शहरात या दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत हजारो युवक -युवतींनी सहभाग घेतला असून जागतिक आदिवासी दिनानिमित्त फिट इंडिया अभियानाला गडचिरोलीकरांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. 


हे ही वाचा