मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अनुकूल नसल्याची माहिती मिळत आहे.
सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अशातच 10 मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसची अशी मागणी आहे की, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी. परंतु, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, रिपोर्ट्स आले नसल्यामुळे हे आमदार उपस्थित राहू शकलेले नाहीत. अशातच जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली, तर किती आमदार उपस्थित राहू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. त्याचसोबत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चा आणि तो मंजूर करुन घेणं हे सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे तुर्तास अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नाहीत.
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपलं प्राधान्य सध्या अर्थसंकल्प मंजूर करुन घेणं असल्याचं सांगितलं. परंतु, काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, तसेच विरोधा पक्षांकडूनही रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावरुन महाविकास आघाडी सरकारवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन महाविकासआघाडीत एकमत होताना दिसत नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Budget, Fuel Price: पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत : अजित पवार
- Maha Budget 2021 | अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा
- Maha Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव घोषणा, अजितदादांनी मुंबईला काय दिलं?
- महिला दिनी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा; महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत