मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा जाहीर कार्यक्रमता तोल गेला. शेतकऱ्यांच्या गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू असं वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केला आहे. एवढच बोलून लोणीकर थांबले नाही तर पुढे जात स्टेजवर बसलेल्या महिला तहसीलदार या हिरोईनसारख्या दिसतात असे आक्षेपार्ह वकत्व्य केलं आणि साहजिकच या महिला तहसीलदार स्टेजवरून उठून गेल्या. लोणीकरांच्या या प्रश्नामुळे साहजिकच ते शेतकरी प्रश्नाविषयी किती गंभीर आहे हे दिसून आले. एवढच नाही तर या वक्तव्यानंतर वाद होत आहे हे कळाल्यानंतर त्यांनी पुन्हा सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.


हिरोईनला मराठीत नायिका म्हणतात आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला असं मला म्हणायच होतं. त्यामुळे विरोधकांनी यांच भांडवल करू नये. साहजिकच या लोणीकरांच्या या वक्तव्यानंतर टीका तर होणार होती. मूळ प्रश्न आहेत की नेत्यांच्या अशा वळवळणाऱ्या जिव्हांच करायच काय? लोणीकर हे असे पहिले नेते नाहीत ज्यांनी या प्रकारच आक्षेपार्ह वक्तव्य केल आहे. यापूर्वी देखील अनेक राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्य केली आहेत. अशा प्रकारे लोणीकरांसारखे नेते आक्षेपार्ह वक्तव्य करणार असतील तर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल का करू नये? तसेच पक्ष म्हणून भाजप काय भूमिका घेणार ? लोणीकरांवर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह ‘माझा विशेष’ मध्ये करण्यात आला आहे.

एखाद्या जाहीर सभेत स्टेजवर बसलेल्या महिला अधिकाऱ्यांला उद्देशून या प्रकारच आक्षेपार्ह विधान करण यामध्ये कसल भूषण आहे ? यावर अशी सारवासारव करण हे अयोग्य आहे. मराठी भाषा ही द्वैअर्थी वापरली जाऊ शकते पण त्यामध्ये तुम्ही तुमचा सूर बदलतो आणि तसा त्या भाषेचा अर्थ बदलतो. बबनराव लोणीकरांना काय अर्थ अपेक्षित होता याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यामुळे अशा नेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेच आणि त्याचबरोबर बबनराव लोणीकरांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, असा सूर या चर्चेत उमटला आहे.

प्रत्येक स्त्रीचा आणि तिच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे : सायली संजीव

शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात स्त्रीयांचा सन्मान केला जातो. त्याच महाराष्ट्रात स्त्रीयांचा सन्मान केलाचं पाहिजे. कोणाल चिडवताना हिरोईन शब्द वापरू नये कारण आम्ही जे काम करतो ते अत्यंत कष्टाच काम आहे. अशा आक्षेपार्ह विधानामुळे  आम्हाला गृहीत धरलं जाते आणि कुठेतरी आमचा अवमान केला जातो. त्यामुळे अर्थातच मला हे आक्षेपार्ह विधान वाटते आणि त्यांनी याची जाहीर माफी मागावी असे मला वाटते.  महिला राजकरणात मागे पडत आहे. महिला एकत्र येऊन राजकरणात सक्रिय होणे गरजेचे आहे. जीभेवर ताबा ठेवला पाहिजे.  चूक झाल्यावर त्याक्षणी  जाहीर माफी  मागितली पाहिजे. महिला आयोग पक्षविरहीत असावे. महिला आयोगाने आपल्या पक्षातील वाचावीरांची बाजू  न घेता सर्वांनी एकत्र येऊन कारवाई केली पाहिजे. हिरोईन आणा म्हणजे आम्ही कोणती वस्तू नाही. प्रत्येक स्त्री जे काम करते त्याचा सन्मान झालाचं पाहिजे. अशा वाचळवीरांवर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.
Majha Vishesh | नेत्यांच्या वळवळणाऱ्या जीभेचं करायचं काय? | माझा विशेष



महिलांचा अपमान आहे : तृप्ती देसाई

लोणीकर हे माजी मंत्री होते. आज त्यांनी जे वक्तव्य केल हे अत्यंत संतापजनक आहे. नेमके हे राजकीय नेते महिलांना काय समजतात? त्यांची मानसिकता यातून आपल्याला दिसून येते. यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे. मी अस म्हणलो नाही असं म्हणत सारवासारव करणे हे अत्यंत चुकीचे आहे.भाजपने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हा महिलांचा अपमान आहे. आज विविध क्षेत्रात महिला काम करत आहे. जर राजकीय नेते त्यांच्याकडे या नजरेने बघणार असतील किंवा जाहीर भाषणात त्यांचा अपमान करत असतील तर त्यांना वेळीच लगाम घातला पाहिजे. अन्यथा यांना समज किंवा गुन्हा दाखल केला नाही अशा प्रवृत्तीला पाठबळ मिळेल. सगळ्या पक्षांमध्ये शेतकरी, महिलांची वादग्रस्त विधाने केली आहे. महिला म्हणून एकत्र आले पाहिजे. या सगळ्यांची पक्षातून हाकलपट्टी झाली पाहिजे.

लोणीकरांवर मानहानीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे :  पूजा मोरे

आज जी काही घटना जालना जिल्ह्यात  आक्षेपार्ह घडली आहे. आज महिला तहसीलदार आहे याचा मला अभिमान वाटतो. संपूर्ण महाराष्ट्रातील  महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व सामाजिक संघटना या महिला तहशीलदारांच्या पाठीशी आहे. या संदर्भात तक्रार करण्यासठी तहसीलदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोणीकरांवर मानहानीचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. परवा जालना जिल्ह्यातील मुलीचा विनयभंगाची घटना ताजी असताना  पुन्हा जिल्ह्यात महिला तहसील अधिकाऱ्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजे गावगुंडाना पाठबळ देण्याच काम लोकप्रतिनधींनीकडून होत आहे  की काय? असा प्रश्न पडत आहे. ही विकृती आहे. एका पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा या विकृतीला ठेचून काढले पाहिजे. या नेत्यांपेक्षा मला जनतेची कीव येते अशा नेत्यांना जनता का निवडून देते? असा मला प्रश्न पडतो. मत पेटीच्या माध्यमातून अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवून केली पाहिजे. महिला आयोगाची अध्यक्ष एका पक्षाची नसावी. आयोग एक स्वायत्त संस्था असावी. जेणेकरून महिलांना न्याय मिळेल. महिला आयोग आपेक्ष घेत नसेल तर निवडणुक आयोगाने देखील यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. वाचाळवीरांची यादी वाढत असेल तर निवडणुक आयोगाने त्यांच्यावर एका ठराविक कालावधीसाठी बंदी  घातली पाहिजे. त्यांना अशी शिक्षा दिली तर खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. जनतेने देखील अशा  वाचाळवीरांच्या खुर्च्या रिकाम्या केल्या पाहिजे.

लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चित्रा वाघ

या विधानाच समर्थन कोणीही करणार नाही. मी  गेली 20-25 वर्षे राजकारणात आहे. एखाद्या व्यसपीठावर भाषण करतान, बोलण्याच्या ओघात किंवा गंमत करताना देखील एखाद्या महिलेविषयी बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे. शब्द हे मोजून मापून वापरले पाहिजे. या वक्तव्याचा मी समर्थन करत नाही. हे निषेधार्ह आहे.

लोणीकरांनी लेखी माफी मागावी : मनिषा कायंदे

लोणीकरांना जे वक्त्व्य केले ते भाषणाच्या ओघात त्यांची जीभ घसरली हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. वक्त्व्यानंतर त्यांची जी केविलवाणी सारवासारव सुरू आहे. ती त्यापेक्षा वाईट आहे. त्यांनी  तहसीलदारांना पत्र पाठवावे आणि त्यांची  लेखी माफी मागावी. ही वाक्य सर्रास वापरली जातात. भाजपमध्ये सतत वापरले जाते. बेटी बचावो आणि बेटी सिखाओ म्हणायच आणि या प्रकारची विधान करायची स्त्रीयांची अवहेलना करायची ही या प्रकारच्या भाषणांमुळे आणि वकत्व्यामुळे केली जाते. महिला आयोगाच्या अध्यक्षा ही पक्षाच्या असतात. आचारसंहिता घालून दिली पाहिजे. योग्य वेळी  आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे. त्यांना समज देणे गरजेचे आहे. अशा विचाकरांना योग्य वेळी ठेचली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान आहे. घरी जाऊन तहसीलदारांची  माफी मागावी.

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे : रूपाली चाकणकर 

महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आहे. सातत्याने भाजप नेते, प्रवक्ते बेताल वक्तव्य करतात यामागे त्यांची नक्की भूमिका काय आहे. हे बीज कोठन रोवले गेली याचा विचार केला पाहिजे. विषय शेतकऱ्यांचा असेल तर त्याची जाहिरात महिलांच्या माध्यमातून करायचा प्रश्न येतोच कुठे ? बबनराव लोणीकर यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन राजकारणात प्रवेश केला. त्या छत्रपती महाराजांनी परस्त्रीचा देखील साडी चोळी देऊन सन्मान केला होता. ही महाराष्ट्राची शिकवण आहे. याचा कुठेतरी लोणीकरांना विसर पडला आहे. आम्ही जिजाई, सावित्रींच्या लेकी आहोत आणि विचारांनी आम्ही हिरोईन आहोतच ते आम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. बबनरावांनी तहसीलदारांची जाहीर माफी मागावी. आणि त्याचबरोबर तहसीलदारांनी देखील विनयभंगाची तक्रार दाखल करावी. कारण अशी बेताल वक्तव्य करताना समाजाचे भान राहत नाही. अशी विकृती खुडून काढणे गरजेचे आहे.  नेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला पाहिजे. महिला आयोगाने तटस्थ भूमिका घेतली पाहिजे. महिला आयोगाने या प्रकारे काम करणे गरजेचे आहे. पक्षाने त्यांच्या कडक कारवाई केली पाहिजे. महिला आयोगाने देखील गेली पाच वर्षात कोणतीही कारवाई न केल्याने अशा प्रकारची विकृती वाढीस लागली आहे. पक्ष, महिला आयोगाच्या माध्यमातून कारवाई होईल पण महिलांनी जनसामन्यातून लढा देऊन आवाज उठावला पाहिजे. यांच्यावर धाक बसेल.