गडचिरोली : राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या. यावेळी त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. एक ते दीड महिन्यापूर्वी येथे एका दिवसांमध्ये जिल्हा पोलीस दलाने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली होती. या पोलीस ठाण्याच्या परिसराची पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पाहणी करून नक्षल समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलसेल गडचिरोली परिक्षेत्राचे आयजी संदीप पाटील डीआयजी अंकित गोयल उपस्थित होते. दरम्यान, भविष्यातही नागरिकांचे असेच  सहकार्य राहिले तर नक्षलवाद पूर्णपणे संपवू, असा विश्वास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केला.


पोलीस महासंचालकांच्या हस्ते आदिवासी नागरिकांना साहित्य वाटप


पोलीस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याला संबोधित करत मेळाव्यात उपस्थित आदिवासी नागरिकांना शेती, घरगुती, शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप केले. मेळाव्याला संबोधित करताना आदिवासी नागरिकांना पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन करिता जिल्हा पोलीस आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी मेळाव्याला उपस्थित विद्यार्थिनी आणि नागरिकांशी संवाद साधला.


पोलीस महासंचालकांसमोर जवानांनी वाचला समस्यांचा पाढा


राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अतिदुर्गम गर्देवाडा भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसाठी दरबार भरवून समस्या जाणून घेतले. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांनी दुर्गम भागात कर्तव्य बजावताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला.  पोलीस महासंचालक शुक्ला यांनी जवानांच्या समस्या जाणून घेत शासन स्तरावरून  समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून वेगवर्धित पदोन्नती, विशेष कामगिरीसाठी रिवार्ड या प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच केले जातील असे सांगितले. 







रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.  महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक, आहेत.  सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. 


आणखी वाचा :


पाण्याचा मीटर चोरल्याचा संशय, ठाण्यात जमावाने धू धू धुतले, दोघांचा मृत्यू