पुणे: केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी केलेल्या एका वक्तवाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही असं दिलीप मंडल यांनी म्हटलं आहे. फातिमा शेख हे कल्पोकल्पित पात्र आहे, असं वादग्रस्त वक्तव्य दिलीप मंडल यांनी केलं आहे, तर दुसरीकडे फातिमा शेख यांचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आढळल्याचा दावा देखील केला जातो. हे पात्र आहे इतिहासात असल्याचं बोललं जातं त्याचबरोबर फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांन मदत केल्याचं सांगितलं जातं, मात्र दिलीप मंडल यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
फातिमा शेख त्यांची ही निर्मिती आहे, तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत
दिलीप मंडल हे अनेक वर्षे माध्यमांमध्ये होते. ते प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं आहे. पुस्तके लिहली आहेत. विशेषत: त्यांनी संघावर, भाजपवरती आणि हिंदुत्वावरती अनेकदा कठोर टीका केलेली आहे. फातिमा शेख यांच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जीवनातील उल्लेखाविषयी दिलीप मंडल यांनी मोठा दावा केला आहे. दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, फातिमा शेख त्यांची ही निर्मिती आहे, तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत. दिलीप मंडल यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती. दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणालेत दिलीप मंडल?
दिलीप मंडल यांनी 2019-2020 मध्ये काही लेख लिहले होते, त्यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला गेला होता. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्यासोबतच फातिमा शेख यांचंही काम होतं, आणि फातिमा शेख यांनी शाळा चालवण्यामध्ये सहकार्य केलं असा उल्लेख त्यांच्याकडून वारंवार केला गेला होता. त्यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचं पात्र हे त्यांनी उभं केलं. फातिमा शेख यांचा पुर्णपणे उल्लेख कुठेही, सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या लिखाणामध्ये किंवा जीवनामध्ये आढळत नाही. त्यांच्याविषयी जे जीवनचरित्र लिहलं गेलं त्यामध्ये देखील फातिमा शेख यांचा उल्लेख नाही. फातिम शेख हे मी तयार केलेलं पात्र होतं असंही दिलीप मंडल यांनी म्हटलं आहे.
जाणकारांनी काय म्हटलं आहे?
दुसऱ्या बाजुला काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला रेगे यांनी महाराष्ट्रामध्ये यावरती पुर्वी काम केलेलं आहे. त्यांच्या लिखाणामध्ये अभ्यासामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता दिलीप मंडल यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती देताना जेएनयुचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी म्हटलं, महात्मा फुले यांचा गौरव ग्रंथ य.दि.फडके यांनी संपादित केलेला आहे. साधारण 30-35 वर्षांपूर्वी तो गौरव ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. त्या गौरव ग्रंथामध्ये फातिमा शेख, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे उल्लेख आहेत. थोडक्यात साळवे यांचा फोटो कदाचित 14 वर्षांची मुलगी शाळेत शिकणारी विद्यार्थिनी ज्यांनी खूप प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यांचा फोटो उपलब्ध नाही. मात्र, इतिहासात त्यांचा उल्लेख आहे. ती व्यक्ती इतिहासात हयात आहे. अस्तित्वात आहे. तशाच फातिमा शेख या नगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी शिकवण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. असा उल्लेख आहे. त्यानुसार त्या महात्मा फुले यांच्या शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. य.दि.फडके यांच्या संपादित गौरव ग्रंथात असे लिहिलेलं आहे. महाराष्ट्रात साधारणता 1980 पासून प्रतिमा शेख यांच्यावरती चर्चा आहे. परिसंवाद होतात. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कामात त्यांचा सहभाग आहे. अशी चर्चा होते. त्यामुळे आता केलेला जो दावा आहे. तो दावा कोणत्या आधारावर करत आहेत, तो भाग त्यांना विचारायला हवा. पण, हा एक मोठा वैचारिक गोंधळ करण्याचा षडयंत्र आहे. असा मुद्दा आहे, पण फातिमा शेख हे पात्र आहे. 1980 पासून त्यांची चर्चा आहे आणि महात्मा फुले यांच्या गौरव ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे, असेही पुढे मिलिंद आव्हाड यांनी म्हटले आहे