घाबरायला मी काय ब्राह्मण आहे? : दिलीप कांबळे

Continues below advertisement
लातूर : राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातुरात वादग्रस्त विधान केलं आहे. आंदोलनं होऊ द्या, आंदोलनाला घाबरायला मी काय ब्राह्मण आहे? असं विधान दिलीप कांबळे यांनी केलं. लातूरमध्ये काल (रविवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कांबळे बोलत होते. या विधानाला संदर्भ आंदोलनांचा होता. दिलीप कांबळे म्हणाले की, "सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने सरकारच्या बदनामीसाठी आंदोलन केली जात आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघून गेल्यावर घोषणा दिल्या. हिंमत असेल तर माझ्यासमोर घोषणा द्यायच्या होत्या. मी मुस्काटात लावल्या असत्या. मी दलित आहे. मी काय ब्राह्मण आहे का? हे सरकार सर्वप्रकारच्या दलालांच्या विरोधात आहे. म्हणून काही लोकांची पोटं दुखायला लागली आहेत." दिलीप कांबळे यांच्या विधानानंतर कार्यक्रमात उपस्थित असलेले लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "आज होळी आहे. त्यामुळे मंत्री जे काही बोलले ते कोणी मनावर घेऊ नये," असं निलंगेकर म्हणाले. पाहा व्हिडीओ
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola