मुंबई :  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप याबाबत ठोस निर्णय काही झालेला नाही यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.  या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरु करण्यात आले असून  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याचिका (petition) पाठवण्यात येणार आहेत. तसेच सुभाष देसाई पुढच्या काही दिवसात नवी दिल्ली येथे जाऊन देशाचे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे  सहीचे एक पत्र सुपूर्द करणार आहेत. या पत्रात 27  फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे याच दिवशी 'अभिजात' दर्जा देण्याच्या निर्णयाची घोषणा करावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. 


मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा या मागणीसाठी विविध क्षेत्रातील लोक  एकत्र आले  असून खूप चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळालेला आहे. या सर्वांच्या स्वाक्षरीने या पत्राची परिणामकारकता आणि बळ निश्चितच वाढणार आहे. 


पत्रावर सह्या करण्यासाठी समोर आलेल्यांची आत्तापर्यंतची यादी खालीलप्रमाणे आहे -



  • सचिन पिळगावकर, अभिनेता 

  • नागराज मंजुळे, दिग्दर्शक  

  • अच्युत गोडबोले, लेखक  

  • विक्रम गोखले, अभिनेता

  • सई परांजपे, दिग्दर्शिका

  • प्रशांत दामले, अभिनेता

  • सुरेश वाडकर, गायक

  • एअर मार्शल भूषण गोखले, वायुदल

  • सुभाष अवचट, चित्रकार 

  • शरद कापूसकर, शिल्पकार

  • सुचेता चापेकर, शास्त्रीय नृत्य

  • अशोक पत्की, संगीतकार

  • डॉ. मोहन आगाशे. अभिनेता  

  • रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री

  • भारती आचरेकर, अभिनेत्री

  • सुनंदन लेले, क्रीडा पत्रकार  

  • राजेश मापुस्कर, दिग्दर्शक  

  • द्वारकानाथ संझगिरी, क्रीडापत्रकार

  •  डॉ. पंडित विद्यासागर, कुलगुरु-  नांदेड विद्यापीठ 

  • सुनील सुकथनकर, दिग्दर्शक  

  • डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू - पुणे विद्यापीठ

  •  सतीश आळेकर, लेखक


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Marathi : मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याला विलंब का? ही आहेत कारणं


Priyanka Chaturvedi: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार; खा. प्रियंका चतुर्वेदींच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर