Kalyan: कल्याण तालुक्यातील कांबा येथील दगडखाणीना स्थानिक आदिवासी बांधवांचा विरोध सुरू आहे. त्यातच दगडखाणीमध्ये दगडफेक करणाऱ्या तीन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात या परिसरातील आदिवासी बांधवानी पोलिसांच्या कारवाईच्या निषेध करत आम्हाला पण अटक करा अशी मागणी करीत टिटवाळा पोलिस स्टेशनच्या आवारात पारंपारिक आदिवासी नृत्य सुरु केले. या आंदोलनकर्त्यांची समजूत काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या हे निषेध आंदोलन सुरुच आहे.
कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात मोठ्या दगडखाणी आहेत. स्थानिक आदिवासी नागरीक या दगडखाणीला अनेक वर्षापासून विरोध करीत आहे. वारंवार दगड खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे घरांची दुरवस्था झाली आहे. त्यांचे जीवन धोक्यात आले. त्यामुळे या दगडखाणी बंद कराव्यात अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. या मागनीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार केला आहे . काही दिवसापूर्वी कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी देखील हे मान्य केले होते. त्या ठिकाणी आदिवासी शंभर वर्षापासून राहतात. या दगडखाणींना सरकारकडून परवानगी आहे. यासंदर्भात चर्चा करत समनव्यातुन मध्यम मार्ग काढन्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. त्यानंतर दगडखाणीत दगडफेक केल्याच्या आरोपाखाली तीन आदिवासी तरुणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली.
या कारवाई विरोधात या पाड्यावरील आदिवासी कुटुंबांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या कारवाईच्या निषेध केला यावेळी आदिवासी बांधवांनी आमच्या तीन जणांना अटक केली असेल तर आम्हालाही अटक करा अशी मागणी करीत पोलिस ठाण्याच्या आवारात आदिवासी पारंपारिक नृत्य करीत आंदोलन सुरु केल. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आमची कारवाई योग्य आहे. दगडफेक प्रकरणी तिघांना अटक केलीय. आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी महसूल खाते किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन समस्या सोडवून घ्यावी असं सांगितलं. मात्र, दोन तास आंदोलन सुरूच असल्यानं पोलीस आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हे देखील वाचा-
- Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...
- Nashik Crime : एक मृतदेह पालघरमध्ये, तर दुसरा नगरमध्ये; संपत्तीवर डोळा ठेवून माजी कुलसचिवांची मुलासह हत्या
- Kirit Somaiya on Sanjay Raut : राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या म्हणाले, हम तो डुबेंगे तो ठाकरे तुम्हे ले डुबेंगे...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha