Dhule ST Depot : प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आपण नेहमीच पाहतो. मात्र याच एसटी कर्मचाऱ्यांसाठी धुळे आगारात उभारण्यात आलेल्या विश्रांतीच्या निवासस्थानाचं भीषण वास्तव एबीपी माझाने समोर आणले. मुलभूत सुविधांची वानवा असताना देखील दिवाळीत एसटीला सर्वाधिक उत्पन्न धुळे विभागातून मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता तरी आमच्या मागण्या पूर्ण करा अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहे. 


धुळे विभागात  मुलभूत सुविधांचीही वानवा आहे. कुठे प्रवाशांना बसण्यासाठी बाकांची सोय नाही. कुठे शौचालयाची दूरावस्था झाली आहे. विभागाची सुरक्षा तर रामभरोसेच आहे. घाणीचं प्रचंड साम्राज्य, डासांचा उपद्रव या गोष्टी नेहमीच्याच आहेत. हजारो रूपयांचा निधी शिक्षणासाठी असतानाही धुळे आगारात कमतरता आहे. अशा परिस्थितीत देखील कर्मचारी काम करत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाला एकट्या धुळे विभागाने 11 कोटी 41 लाख  रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. ज्या चालक वाहकांच्या जीवावर तुमचा आणि आमचा प्रवास सुखरूप होतो. त्या कर्मचाऱ्यांना किमान मुबलक सोयी सुविधा तरी द्या एवढीच माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.




दिवाळीत एसटी महामंडळाचे उत्पन्न तब्बल 218 कोटी


दिवाळीत एसटी महामंडळाचे उत्पन्न तब्बल 218 कोटी रुपयांवर पोहचले आहे.  दिवाळी काळात एसटी महामंडळाने प्रति किलो मीटर जास्तीत जास्त उत्पन्न आणण्यासाठी प्रत्येक विभागाला दैनंदिन उद्दिष्ट दिले होते. त्यामध्ये धुळे विभाग प्रथम, जळगाव विभाग द्वितीय तर कोल्हापूर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.  दिवाळीमध्ये सर्वाधिक उत्पन्न 31 ऑक्टोबर रोजी 25 कोटी लाख इतके आले आहे.
दिवाळीपूर्वी एसटीचे दैनंदिन उत्पन्न सरासरी 13 कोटीच्या आसपास होते. ते दिवाळीमध्ये तब्बल 20 कोटीपर्यंत गेले आहे.


स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दूरावस्था


धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहाची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. तर या ठिकाणी मुक्कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट जमिनीवरच झोपावं लागतंय.  या ठिकाणी स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली असून घाणीचं साम्राज्य प्रचंड पसरला आहे. तर याच आवारात काही मद्याच्या बाटल्या देखील पडल्या आहेत. बाथरूममधून बाहेर पडणारे पाणी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचून डासांचा गेल्या काही दिवसांपासून उपद्रव वाढला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


 एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ, आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत