पोलीस स्टेशनच्या आवारातच डीजेच्या तालावर पोलीस थिरकले!
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2017 08:49 AM (IST)
धुळे: पोलीस चौकीत नाचणारे पोलीस तुम्ही सिनेमात पाहिले असतील, मात्र धुळ्यात हे प्रत्यक्षात घडलं आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात वर्दीत असणारे पोलीस डीजेच्या तालावर चांगलेच थिरकले. या पोलीस स्टेशनचे पीएसआय मिलींद बनसोडे यांचा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर हा प्रकार झाला. पोलीस स्टेशनच्या आवारात डीजे वाजवू नये असा आदेश आहे. मात्र, इथं हा नियम सरळ पायदळी तुडवला गेला. ध्वनी प्रदूषणसंदर्भात काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी जनतेला आवाहन केलं होतं. मात्र, आता धुळ्यातील पोलिसांनीच ध्वनी प्रदूषण कायदा पायदळी तुडवल्यानंतर आता धुळ्याचे अधीक्षक यावर काय कारवाई करतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.