धुळे : धुळ्यात अनैतिक संबंधांतून 30 वर्षीय तरुणीची लॉजमध्ये हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हत्येप्रकरणी 34 वर्षीय रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


तरुणीचा मृतदेह लॉजमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. धुळे शहरातील प्रभाकर चित्रमंदिरसमोर असलेल्या राजस्थान लॉजच्या रुम नंबर 101 मध्ये 18 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली.

तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. जळगाव जिल्ह्यातील धरणगांव तालुक्यातील पाळधीमध्ये राहणाऱ्या नितीन विश्वनाथ पाटील या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. त्याने अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची कबुली दिली.

या घटनेमुळे लॉजमधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, लॉजमध्ये थांबणाऱ्या व्यक्तीचा आयडी प्रूफ खरंच तपासला जातो का? यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.