काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2018 11:25 AM (IST)
मात्र, धुळे जिल्ह्यात एकाच वेळी दोन नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु झाल्याने राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
धुळे : धुळे आणि शिरपूरमध्ये आयकर विभागाने छापा टाकला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांच्या तसंच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी, कंपन्यांची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. आयकर विभागाने राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील तर अमरिश पटेल यांच्या शिरपूर इथल्या निवासस्थानी आज सकाळी 9 च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या चौकशी पथकात सुमारे 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात एकाच वेळी दोन नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु झाल्याने राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.