धुळे : मित्रांच्या मस्करीत तरुणाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना धुळ्यातील वार-कुंडाणे गावात घडली आहे. दीपक दगडू वाघ असं मृत तरुणाचं नाव असून तो 28 वर्षांचा होता.


पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, 11 डिसेंबरच्या रात्री दीपक हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी मस्करी करताना एका मित्राजवळ असलेल्या पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती थेट दीपकच्या शरीरात घुसली. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी धुळे पोलिसांनी पंकज डिसुजा आणि अमृत सागर या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेले दोघेही पत्रकार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, गोळी चुकून लागली की जाणीवपूर्वक झाडली, याचा पोलिस तपास करत आहेत. तसंच मोलमजुरी करणाऱ्या दीपकला केवळ गोळी लागली की गोळी लागण्यापूर्वी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरु आहे.