Dharashiv Tanaji Sawant News : धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीत गटबाजी उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा फोटो शिवसेनेच्या कार्यक्रमातून गायब आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंत यांना पुन्हा डाववले आहे. त्यामुळं माजी मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झालेत. शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीअगोदर तानाजी सावंत समर्थकांनी गोंधळ घातल घोषणाबाजी केली.
तानाजी सावंत यांना नऊ महिन्यांपासून डावलले जातंय, समर्थकांचा आरोप
तानाजी सावंत यांना डाववले जात असल्यानं समर्थक आक्रमक झाले आहेत. राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे समन्वय बैठक संपन्न होत आहे. या बैठकीत तानाजी सावंत समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. तानाजी सावंत यांना नऊ महिन्यांपासून डावलले जात असल्याचा समर्थकांचा आरोप राजन साळवी यांच्यासमोर सावंत यांच्या समर्थकांनी करत घोषणाबाजी केली. कुटुंबातील गोष्टी चर्चा करून सोडवू, माध्यमांसमोर नको अशी भूमिका साळवी यांन घेतली आहे.
तानाजी सावंत समर्थक आणि राजन साळवी यांची बंद दाराआड बैठक सुरु
गोंधळानंतर तानाजी सावंत समर्थक आणि राजन साळवी यांची बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्याकडून बैठकीच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंत यांना स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर सावंत यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने घेतलेल्या समन्वय बैठकीतच गटबाजी उफाळून आली आहे.
तानाजी सावंत यांनी पावसाळी अधिवेशनाकडेही फिरवली होती पाठ
माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे (Bhum Paranda Assembly Constituency) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत अवघ्या 1500 मताने निवडून आले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तानाजी सावंत यांना राज्यात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सावंत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सावंत यांनी पावसाळी अधिवेशनाकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे तानाजी सावंतांचं नेमकं चाललंय काय याची मतदारसंघासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: