Dharashiv : हैदराबादवरुन पंढरपूरच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर पंढरपूर समजून तुळजापुरातच उतरवल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. श्री तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घालून नळदुर्ग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर उतरले आहे. यामुळं पोलिस, महसूल, बांधकाम प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. याप्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर 10000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. तुळजाभवानी मंदिरावर काही वेळ घिरट्या घालून ते थेट नळदुर्ग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर उतरले. या प्रकाराची कोणतीही पूर्वसूचना महसूल, पोलीस वा बांधकाम विभागाला न मिळाल्याने संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली. पायलटने पंढरपूरसाठी घेतलेल्या परवानगीची माहिती दिल्यानंतरच समजले की हे चुकून तुळजापुरात आले. तुळजापुरातील हेलिपॅडवर उतरल्यावर हेलिकॉप्टरमध्ये इंधनही भरण्यात आलं. इमर्जन्सी लँडिंगसाठी सोलापूरचाही पर्याय होता. मात्र, ते चुकूनच तुळजापुरात उतरल्याचं सांगण्यात आलं. प्रशासनाने हेलिकॉप्टर कंपनीवर 10000 रुपयांचा दंड आकारला. इंधन भरल्यानंतर हेलिकॉप्टर तुळजापुरातून उड्डाण करुन निघून गेले.
महत्वाच्या बातम्या: